
गडचिरोली : एसआयआर अभियान आणि आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वपूर्ण नियोजन बैठक शुक्रवारी (दि.24) माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडली.
भाजपचे गडचिरोली जिल्हा निवडणूक प्रभारी बंटी ऊर्फ किर्तीकुमार भांगडीया यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी खासदार डॉ.अशोक नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत बैठकीत आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणूक, SIR अंतर्गत मतदार यादी विशेष पुनरिक्षण, नवीन मतदार नोंदणी, मतदार याद्यांतील दुरुस्ती, पात्र मतदारांची नोंद सुनिश्चित करणे, तसेच संघटनात्मक बळकटीकरण या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बुथ स्तरापर्यंत पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, पदवीधर मतदारांपर्यंत प्रभावी संपर्क मोहीम राबविणे, प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने काम करण्याची गरज तसेच आगामी निवडणुकांसाठी सूक्ष्म नियोजन याबाबत आ.भांगडीया आणि डॉ.अशोक नेते यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून आवश्यक रणनिती निश्चित केली.
बैठकीस आमदार डॉ.मिलिंद नरोटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, नगराध्यक्ष ॲड.प्रणोती सागर निंबोरकर, माजी आमदार डॉ.देवराव होळी, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखा डोळस, आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ.नितीन कोडवते, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे, प्रांत तेली समाज अध्यक्ष प्रमोद पिपरे, शहराध्यक्ष तथा नगरपरिषद बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष योगिता पिपरे, डॉ.चंदा कोडवते यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
































