गडचिरोली : जिल्हा काँग्रेस कमिटी व राजीव गांधी पंचायत राज विभाग, गडचिरोली जिल्हा यांच्या वतीने जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय सर्वोदय संकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराची सुरुवात महाराजा सेलिब्रेशन हॉल येथे रविवारी (27 एप्रिल) ध्वजारोहण करून करण्यात आली.
या शिबिराच्या माध्यमातून काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पंचायतराज व्यवस्था, काँग्रेस पक्षाचा इतिहास, काँग्रेस नेत्यांचा त्याग, समर्पण आणि त्या माध्यमातून राष्ट्रउभारणीत काँग्रेसचे आजपर्यंतचे योगदान व पुढील वाटचाल सारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन केले जात आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष तथा जिल्हा निरीक्षक अॅड.सचिन नाईक, गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, आरमोरीचे आमदार रामदास मसाराम, राजीव गांधी पंचायतराज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय ठाकरे, विदर्भ समन्वयक मनोज भोयर, प्रदेश महासचिव कुसुम आलम, जिल्हाध्यक्ष राजू गारुदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पा.पोरेटी, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विश्वजीत कोवासे, शहराध्यक्ष सतीश विधाते, जि.प.चे माजी उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन नाट, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, वडसाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, एटापल्ली तालुकाध्यक्ष रमेश गंपावार, सिरोंचा तालुकाध्यक्ष सतीश जवाजी, रमेश चौधरी, नेताजी गावतुरे, रजनीकांत मोटघरे, नितेश राठोड, प्रभाकर वासेकर, देवाजी सोनटक्के, अनिल कोठारे, रुपेश टिकले, हरबाजी मोरे, अब्दुल पंज्वानी, जयंत हरडे, गिरीधर तितराम, दिलीप घोडाम, विनोद लेनगुरे, भूपेश कोलते, दत्तात्रय खरवडे, घनश्याम वाढई, उत्तम ठाकरे, सुरेश भांडेकर, श्रीराम दुगा, निशांत वनमाळी, कविता भगत, वृंदा गजभिये यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.