राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारिणीच्या आढावा बैठकीत नवनियुक्तांचे पदग्रहण

निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीच्या सूचना

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक शनिवारी गडचिरोलीत झाली. राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ पार पडला.

यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.

यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, गोंदिया जिल्ह्याचे राकाँ अध्यक्ष गंगाधर परशुरामकर, माजी जि.प.सभापती कोदंडधारी नाकाडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.