अन्न-औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम सोमवारपासून आठवडाभर जिल्ह्यात

कोरचीपासून भामरागडपर्यंत बैठकांचे आयोजन

गडचिरोली : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम सोमवारपासून आठवडाभर गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर राहणार आहेत. यादरम्यान जिल्ह्यात विविध ठिकाणी भेटी देऊन शासकीय कामांच्या आढाव्यासोबत पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठका घेतील.

ना.धर्मरावबाबा आत्राम यांचे सोमवारी इंदोरवरून नागपूरमार्गे संध्याकाळी अहेरी येथे आगमन होईल. दि.१९ ला दुपारी ते गडचिरोलीत येतील. सुयोग निवासस्थानी त्यांचा मुक्काम राहणार आहे. दि.२० ला सकाळी कोरची तहसील कार्यालयात शासकीय कामकाजाचा आढावा आणि विश्रामगृहावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतील. दुपारी कुरखेडा उपविभागीय अधिकारी कार्यालयात शासकीय कामकाजाचा आढावा आणि विश्रामगृहात पक्ष कार्यकर्त्यांसोबत बैठक, त्यानंतर वैरागड येथे बलराम सोमनानी यांच्याकडील कार्यक्रमाला उपस्थित राहून गडचिरोलीत मुक्कामी येतील.

दि.२१ ला देसाईगंज आणि आरमोरी येथे शासकीय कामकाजाचा आढावा आणि पक्ष कार्यकर्त्यांची बैठक घेऊन गडचिरोलीत मुक्कामी येतील. दि.२२ ला गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रम आणि जिल्हा परिषदेत आढावा बैठक घेऊन अहेरी मुक्कामी जातील. दि.२३ ला भामरागड येथे शासकीय कामांचा आढावा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतील. दि.२४ ला सकाळी चंद्रपूरमार्गे नागपूरकडे रवाना होतील.