कोरची, कुरखेडात महायुतीचे पदाधिकारी आणि बुथ प्रमुखांची सहविचार बैठक

भरगच्च बैठकीत खासदारांचे मार्गदर्शन

गडचिरोली : विरोधक कितीही अपप्रचार करत असले तरी गडचिरोली जिल्ह्यात आणि संपूर्ण देशात गेल्या 10 वर्षात झालेला बदल सर्वांना उघड्या डोळ्यांनी दिसत आहे. विकासाची दृष्टी असणाऱ्या या सरकारची कामे न पाहता विरोधक मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. ही बाब मतदारांच्या निदर्शनास आणून द्या आणि विकासित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी मला पुन्हा एकदा सेवेची संधी द्या, अशी विनंती महायुतीचे उमेदवार तथा खासदार अशोक नेते यांनी कार्यकर्त्यांच्या सहविचार सभेत कोरची आणि कुरखेडा येथे केली.

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खा.अशोक नेते यांनी सर्वप्रथम बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर लगेचच कोरची येथे आनंद चौबे यांच्या दुकानात, तर कुरखेडा येथील प्रचार कार्यालयात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची सहविचार संघटनात्मक बैठक घेतली. यावेळी मोठ्या संख्येने महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीला प्रामुख्याने कोरची येथील भाजपचे तालुकाध्यक्ष नसरूद्दीन भामानी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सियाराम हलामी, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष कृष्णा नारदंगे, झाडूराम सलामे, प्रा.देवराव गजभिये, आनंद चौबे, मधुकर नखाते, घनश्याम अग्रवाल, मेघश्याम जामकातन, नंदलाल पंजावानी, अवदराम बागमुल, सदाराम नरोटी, डॉ.दाजगाये, शिला सोनकोत्री, गिरजा कोरेती, सगुणा काटेंगे, प्रतिभा मडावी, नीलकमल मोहुर्ले, हेमिन केवस, नेताराम कौशिक यांच्यासह इतर पदाधिकारी तथा बुथप्रमुख उपस्थित होते.

कुरखेडा येथील बैठकीला पदाधिकारी नंदलाल काबरा, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश जेठानी, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, कृउबा समितीचे उपसभापती व्यंकटी नागीलवार, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक खेमनाथ डोंगरवार, भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अनिल तिडके, ओबीसी आघाडीचे रविंद्र गोटेफोडे, ग्रामीण तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, शहर तालुका अध्यक्ष सागर निरंकारी, माजी तालुका अध्यक्ष नाजूक पुराम, महिला आघाडी तालुका अध्यक्ष जयश्री मडावी, महिला तालुका अध्यक्ष जागृती झोळे, न.प. उपसभापती दुर्गा गोटेफोडे, ताई कावळे, रामभाऊ वैद्य, ज्येष्ठ नेते वसंता मेश्राम, शिक्षक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष नागेश फाये, तालुका महामंत्री विनोद नागपूरकर, भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष उल्हास देशमुख, उपाध्यक्ष श्रीकांत नागीलवार, अतुल झोडे, मुकेश खोब्रागडे आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी खा.अशोक नेते यांना पुन्हा विजयी करण्याचा संकल्प केला.