गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून युवा नेते अमोल कुळमेथे यांच्या नेतृत्वात समता नगर, शिव नगर, कैकाडी समाज वस्तीतील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रविंद्र वासेकर यांनी पक्षाचे दुपट्टे टाकून त्यांचे स्वागत केले.
यावेळी चामोर्शी न.पं.चे नगरसेवक लौकिक भिवापुरे, हरिष राठोड, डॅा.सोनल कोवे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पवार, युवा नेते अजय कुकडकर, ओ.बी.सी.सेलचे जिल्हाध्यक्ष संजय शिंगाडे, भटक्या जमातीचे जिल्हाध्यक्ष किशोर बावणे, जितेंद्र दुधे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
त्यांच्या उपस्थितीत सुनील जगन्नाथ, रामा कंडेलवार, गोपाल जगन्नाथ, गुरुदेव केदारी, समय्या कुंभारे, सारय्या कुंभारे, राजू जगन्नाथ, अविनाश जाधव, डॅनियल कंडेलवार, इसराइल कुंभारे, अक्षय जगन्नाथ, कल्पना प्रकाश जाधव, उज्वला कुंभारे, लक्ष्मी जगन्नाथ, सरिता उभया कंडेलवार, पापम्मा नारायण जगन्नाथ, वंदी गुरुदेव केदारी, वच्छला समय्या कुंभारे यांच्यासह इतर अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.