राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक व पक्षप्रवेश सोहळा

आ.धर्मरावबाबा आत्राम यांची उपस्थिती

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) वतीने माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक तथा पक्षप्रवेश सोहळा गडचिरोलीत झाला. या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी हसीना शेख, नामदेव उडान, उत्तम कोवे, शीतल दूधबावरे, अर्चना कारपेमवार, रूपाली दूधबावरे, मंगेश मडावी, दीपक मेश्राम, आकाश गेडाम, सुरेश तलांडे, सुनील नागपुरे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला. आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी सर्वांचे पक्षाचा दुपट्टा टाकून पक्षात स्वागत केले.

यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला नव्याने पक्षात प्रवेश करणारे माजी आमदार रामकृष्ण मडावी, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख, महिला जिल्हाध्यक्ष डॅा.सोनल कोवे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तनुश्री आत्राम, प्रदेश सरचिटणीस पुष्पा अलोणे, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, अहेरी विधानसभेच्या कार्याध्यक्ष सारिका गडपल्लीवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.