चामोर्शी : येथे कामगार विभागाच्या वतीने बांधकाम कामगारांना विविध साहित्य व टुल किट वाटपाचा कार्यक्रम माजी खासदार व भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री (अनुसूचित जमाती मोर्चा) डॉ.अशोक नेते व जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम यांच्या हस्ते पार पडला. तांत्रिक कारणामुळे संबंधित बेवसाईट बंद झाल्याने तांत्रिक अडचण दूर करून दि.26 मार्च नंतर उर्वरित कामगारांना साहित्य वाटप केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने आ.डॉ.मिलींद नरोटे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. मात्र त्यांनी कामगारांना पिण्याचे पाणी व पेंडॅालची व्यवस्था केली होती. दरम्यान काही तांत्रिक कारणांमुळे शासनाची वेबसाईट बंद झाल्यामुळे बांधकाम कामगारांना त्रास सहन करावा लागल्याने बांधकाम कामगारांनी असंतोष व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, पण दहावीचा पेपर असल्याने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये म्हणून नगरसेवक आशिष पिपरे यांनी तिथे पोहोचून तांत्रिक कारणांमुळे झालेल्या अडचणीची माहिती त्यांना दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याशी चर्चा केल्यानंतर दि.26 मार्च नंतर साईट चालू झाल्यानंतर कामगारांना कोणताही त्रास होणार नाही या पद्धतीने साहित्य वाटण्याचे निर्देश संबंधित संस्थेला देण्यात आले.