महायुतीच्या नेत्यांनी केले धान्य व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी, सदस्यांना मार्गदर्शन

मोदींच्या नेतृत्वातील सरकारसाठी आवाहन

गडचिरोली : संयुक्त धान्य व्यापारी संघटनेची सहविचार बैठक गडचिरोलीतील भगवती राईस मिल येथे खा.अशोक नेते आणि विधान परिषदेचे माजी सदस्य तथा भाजप नेते डॅा.रामदास आंबटकर यांच्या मार्गदर्शनात बुधवारी (दि.१०) पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच देशात धाडसी आणि एेतिहासिक निर्णय घेऊन देशाला प्रगतीपथावर नेऊ शकत असल्याने पुन्हा त्यांना कौल देण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले.

मोदींच्या नेतृत्वातील सरकारचे धाडसी निर्णय आणि सर्व घटकांच्या विकासांच्या संकल्पनेला तुमचीही साथ द्या, असा विश्वास व्यक्त करत पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवायचे आहे. त्यासाठी खासदार म्हणून अशोक नेते यांना आपले प्रतिनिधी म्हणून संसदेत पाठवा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या बैठकीला आमदार डॉ.देवराव होळी, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र ओल्लालवार, प्रदेश सचिव रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष आकाश अग्रवाल, सामाजिक नेते नंदु काबरा, कृउबा समितीचे संचालक तथा उद्योजक नंदकिशोर सारडा, उद्योजक रमेश सारडा, कृउबा समितीचे संचालक दिलिप बुरले, प्रकाश निकुरे, तसेच मोठ्या संख्येने धान्य व्यापारी उपस्थित होते.