एफडीए मंत्री धर्मरावबाबा आत्राम उद्यापासून चार दिवस जिल्ह्यात

गडचिरोलीसह अहेरी क्षेत्रात कार्यक्रम

गडचिरोली : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम हे दि.1 ते 4 जुलैदरम्यान जिल्ह्याच्या दौऱ्यावर राहणार आहेत. या दौऱ्यात ते गडचिरोली शहरासह अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतील. त्यांचे नियोजित कार्यक्रम खालीलप्रमाणे आहेत.

गुरुवार, 1 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 4.30 वा. सुयोग निवासस्थान, गडचिरोली येथे आगमन व मुक्काम. शुक्रवार, दि.2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अहेरी मतदार संघातील विकास कामांबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 1.10 ते 2 वाजेपर्यंत सुयोग निवासस्थान, गडचिरोली येथे राखीव. त्यानंतर अहेरीत येऊन राजवाडा निवासस्थानी मुक्काम करतील.

शनिवार, दि. 3 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. शासकीय विश्रामगृह मुलचेरा येथे आगमन व राखीव. 11 ते दुपारी 12 पर्यंत तहसिल कार्यालय, मुलचेरा येथे विकास कामांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. त्यानंतर सोईनुसार मुलचेरा येथून अहेरीला येऊन मुक्काम करतील.

रविवार, दि. 4 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10.35 वा. महाराज हॉल, गडचिरोली येथे आगमन व कोया किंग ॲण्ड क्विन या नॅशनल लेव्हल ट्रायबल कल्चरल मॉडेलिंग स्पर्धेला उपस्थित राहतील. दुपारी 12 वा. गोंडवाना सैनिक विद्यालय येथे आगमन व ई- पोर्टल कार्यक्रमास उपस्थित राहून नागपूरकडे प्रयाण करतील.