रंगोत्सवात रमले खासदार अशोक नेते, पदाधिकारी-कार्यकर्त्यांना लावला गुलाल

ढोलताशासह गडचिरोली-चामोर्शीत रॅली

गडचिरोली : खासदार आणि महायुतीचे लोकसभेचे उमेदवार अशोक नेते यांनी सोमवारी रंगपंचमीच्या उत्सवात सहभागी होऊन जनसंपर्क कार्यालयासमोर पदाधिकारी-कार्यकर्त्यांना गुलाल लावला. कार्यकर्त्यांनी आणि त्यांनी एकमेकांना गुलाल लावून रंगोत्सवाचा आनंद घेतला.

यानंतर ढोलताशासह इंदिरा गांधी चौकापर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयाचा संकल्प करत जयघोष केला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, प्रकाश गेडाम, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

चामोर्शीत रॅली आाणि आतिषबाजी

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातून खासदार अशोक नेते यांना तिसऱ्यांदा भाजपने उमेदवारी दिल्याचा आनंद आणि विजयाचा संकल्प करत रंगपंचमीनिमित्त चामोर्शी येथे भाजप सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष पिपरे यांनी रॅली काढली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतिषबाजीही केली. गेल्या १० वर्षात लोकसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे झाली असून त्या कामांना अधिक बळ देण्यासाठी खा.नेते यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. यावेळी अमोल आईंचवार, भाजपचे शहर अध्यक्ष सोपान नैताम, श्रावण सोनटक्के, संजय पाटील खेडेकर, युवा नेते नीरज रामानुजवार, नरेश अलसावार, वासुदेव चिचघरे, रेवनाथ कुसराम, शेषराव कोहळे, भाविक आभारे, राजू धोडरे, बंडू नैताम, रमेश अधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.