जिल्हाभरात होळी, रंगोत्सवाची धूम, बालगोपालांसह ज्येष्ठांचाही सहभाग

गाण्यांवर महिलांने नृत्य, पहा व्हिडीओ

गडचिरोली : गडचिरोली शहरासह जिल्हाभरातील नागरिक रविवार, सोमवार असे दोन दिवस होळी पुजनासह रंगोत्सवात न्हाऊन निघाले. शहरात प्रत्येक मोहल्ल्यात रविवारी संध्याकाळी होळ्या पेटल्या होत्या. नागरिकांनी भक्तीभावाने होळी पूजन केले. यात रेव्हेन्यू कॅालनीवासियांनी आकर्षकपणे होळी सजवून महिलांनी सामूहिकपणे फेर धरत पुजन केले.

सोमवारी सकाळपासून जिल्हाभरात बालगोपालांसह वरिष्ठ नागरिकांनीही एकमेकांना रंग आणि गुलाल लावत रंगोत्सवाचा आनंद लुटला. विशेष म्हणजे एरवी दैनंदिन कामकाजात व्यस्त असणाऱ्या महिलांनी एकमेकांना रंग लावत मोठ्या उत्साहाने गाण्यांवर ताल धरत नृत्य केले. शहरातील सर्वोदय वॅार्ड, फुले वॅार्ड, कॅम्प एरिया, रेव्हेन्यू कॅालनी या भागात विशेष उत्साह दिसून आला.