भाजप कामगार मोर्चाच्या महामंत्रीपदी निकोडे, बोदलकर चामोर्शीचे उपाध्यक्ष

सदस्यता नोंदणीला मिळणार गती

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या सदस्यता नोंदणी अभियानादरम्यान मार्च महिन्यामध्ये कामगारांचे भव्य अधिवेशन घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यात अनंतपूर येथील रहिवासी महादेव मोतीराम निकोडे यांची जिल्हा महामंत्रीपदी तर रेखेगाव येथील रहिवासी जानुजी पाटील बोदलकर यांची चामोर्शी तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. दोन्ही पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी माजी आमदार डॅा.नामदेव उसेंड, भाजपचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत वाघरे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव गोवर्धन चव्हाण, जिल्हा अध्यक्ष सुधाकर पेटकर, जिल्हा सचिव रमेश मुरमुरवार, जिल्हा महामंत्री दशरथ सोनटक्के, दक्षिण जिल्हा सचिव दयाराम खोबरे, पश्चिम जिल्हा सचिव विजय शेन्डे, पूर्व जिल्हा सचिव पवन भादुसिंग पवार, प्रमोद राऊत, मीडिया प्रमुख बंडू खोब्रागडे, महामंत्री नरेश हजारे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रेमसागर खोबरे, जिल्हा महिला प्रतिनिधी वंदना मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.