‘सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठीच परिवर्तन पदयात्रा’

अॅड.विश्वजित कोवासे यांचे प्रतिपादन

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रात सुरू करण्यात आलेली परिवर्तन पदयात्रा ही सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठीच आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या आणि प्रश्न जाणून घेतले जात आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या क्षेत्रात परिवर्तनाचे वारे वाहू लागतील, असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अॅड.विश्वजित मारोतराव कोवासे यांनी केले.

चपराळा देवस्थानापासून सुरू झालेली ही परिवर्तन पदयात्रा कोनसरी, अनखोडा, जैरामपूर, लक्ष्मणपूर, किष्टापूर, गणपूर, उमरी, सेलुर, मुधोली रिठ, सगणापूर आदी गावांना भेटी देऊन पुढे आगेकुच करत आहे. या परिवर्तन यात्रेत युती सरकारच्या कामांचा पंचनामा जनतेसमोर मांडला जात आहे.

या यात्रेत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, अॅड.विश्वजीत कोवासे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांच्यासह पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य कविता भगत, विनोद पाटील येलमुले, सरपंच नीलकंठ निखाडे, निकेश गद्देवार, उमेश कुमरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, अनखोडाच्या सरपंच रेखा येलमुले, विवेक गुरनुले, सुरेंद्र नारनवरे, अरुण कुकुडकर, प्रदीप झाडे, लक्ष्मण पोटे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रफुल बारसाकडे, युवक काँग्रेसचे मुन्ना गोंगले यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.