तथागत बुद्ध आणि डॉ.आंबेडकर यांची अस्थिकलश यात्रा 26 ला गडचिरोलीत

देसाईगंजमध्येही निघणार मिरवणूक

गडचिरोली : श्रीलंकेवरून तथागत भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलशाची महायात्रा गडचिरोली शहरात येत्या 26 सष्टेंबर रोजी (गुरुवारला) येणार आहे. दुपारी 3 वाजता इंदिरा गांधी चौकात या अस्थिकलशाचे दर्शन नागरिकांना घेता येणार आहे.

इंडो एशिया मेथ्था फांऊडेशनच्या वतीने ही अस्थिकलश महायात्रा आयोजित करण्यात आली आहे. या अस्थिकलश महायात्रेसोबत भन्ते रेवत पलामोधम्मो, देवमित्ता महाथेरो, सुमनरत्न थेरो (श्रीलंका), होआय व्हु महाथेरो (व्हिएतनाम), भन्ते प्रियदर्शी, भन्ते प्रज्ञापाल, भदन्त ज्ञानज्योती (भारत) तसेच प्रमुख पाहुणे म्हणून इंडो एशिया मेथ्था फाऊंडेशनचे नितीन गजभिये, स्मिता वाकडे (नागपूर) उपस्थित राहून धम्मदेशना व मार्गदर्शन करणार आहेत, असे गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य आयोजक प्रा.मुनिश्वर बोरकर, ॲड.विनय बांबोळे, गोपाल रायपुरे यांनी कळविले.

ही अस्थितकलश यात्रा गडचिरोलीनंतर सांयकाळी 6 वाजता आर्यसत्य बौद्ध विहार, फव्वारा चौक, देसाईगंज येथे पोहोचणार आहे. त्या ठिकाणी मिरवणूक व धम्मदेशना कार्यक्रम झाल्यानंतर ही यात्रा ब्रम्हपुरी येथे मुक्कामी जाणार आहे.

तथागत भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याअस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पंडीत मेश्राम, मारोती भैसारे, मुरलीधर भानारकर, अरुण शेंडे, मिलिंद भानारकर (गडचिरोली) इंजि.निलकंठ पोपटे, संतोष बहादुरे, सुबोध मेश्राम, इंजि.विजय मेश्राम , सुरज लिंगायत, जगदिश तामगाडगे, राजेश बहादुरे (वडसा), किशोर उंदिरवाडे, लोमशे सोरते (व्याहाड), शंकरअण्णा सेनिगरपु (सिरोंचा), विजय रामटेके (ब्रम्हपुरी), कविश्वर झाडे (नवरगांव), ज्ञानेश्वर मुजुमकर (पोटेगांव), प्रमोद सरदारे (कुरखेडा), सोनुजी साखरे (मानापूर), हेमंत मेश्राम, विनोद जांभुळकर, अमोल मेश्राम, शरद लोणारे, जीवन मेश्राम, रोशन उके, अमोल मेश्राम, रुपेश सोनटक्के, विजय देवतळे, नाजुक भैसारे आदींनी केले आहे.