कुरखेडा : आरमोरी विधानसभा क्षेत्रातील माझ्या लाडक्या बहिणींच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता हा कृष्णा सदैव पाठीशी उभा राहिल. माझ्या लाडक्या बहिणींवर जो कोणी अन्याय, अत्याचार करेल त्याला शिक्षा देण्याकरिता हा कृष्णा सर्वप्रथम धावून येणार, असा विश्वास आमदार कृष्णा गजबे यांनी महिलांना दिला. कुरखेडा येथे भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने आयोजित भरगच्च रक्षाबंधन व महिला मेळाव्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
मोठ्या संख्येने जमलेल्या महिलांच्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीता हिंगे भाजपचे तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलू हुसेनी, तसेच आमदार गजबे यांच्या सौभाग्यवती विद्या गजबे, अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड.उमेश वालदे, जिल्हा उपाध्यक्ष नाजुकराम पुराम, ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री रवींद्र गोटेफोडे, शहर अध्यक्ष सागर निरंकारी, नगरसेवक राम वैद्य, धानोरा तालुका अध्यक्ष लता पुंघाटी, प्रा.विनोद नागपूरकर, जिल्हा उपाध्यक्ष रोशनी पारधी, महिला मोर्चाच्या जिल्हा महामंत्री प्रीती शंभरकर, महिला मोर्चाच्या जिल्हा महामंत्री अर्चना ढोरे, सीमा कन्नमवार, जयश्री मडावी, नगरसेविका दुर्गा गोटेफोडे, गीता कुमरे, कल्पना मांडवे, रूपाली कावळे, तसेच महिला पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.
आरमोरी विधानसभा क्षेत्रातील लाडक्या बहिणी ज्या महिला संघाशी व बचत गटाशी जोडल्या गेल्या आहेत त्यांना प्रत्येक गावात हक्काचे सभागृह बांधून दिले जाईल, त्यांच्या मुलांच्या वाचन संस्कृतीवर भर देण्यासाठी प्रत्येक गावात वाचनालय उघडल्या जाईल, अशी घोषणा यावेळी आमदार गजबे यांनी केली. तसेच वंचित महिलांना योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आवाहन केले.
सामूहिक रक्षाबंधन सोहळा
मेळाव्याला उपस्थित भाजपा महिला पदाधिकारी व भगिनींनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना औक्षण करून राख्या बांधल्या. बलात्कार, अत्याचार, चोरी यासारख्या घटना रोखण्यासाठी, आपल्या मुलांना आदर्श नागरिक घडविण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी केले. यावेळी कुरखेडा तालुक्यातील 40 काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष रुपाली कावळे यांच्या नेतृत्वात या महिलांनी भाजपला पसंती दिली. जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, गीता हिंगे यांनी त्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे संचालन भाजप महिला तालुका महामंत्री जयश्री मडावी यांनी, तर प्रास्ताविक रजनी बनसोड यांनी केले. आभार रुपाली कावळे यांनी मानले.