गोंदिया : सालेकसा तालुक्यातील साकरीटोला (सातगांव) येथे शुक्रवारी (दि.२९) भारतीय जनता युवा मोर्चा तालुका सालेकसातर्फे नमो चषक-२०२४ च्या नोंदणी फॅार्म सदस्यता अभियानाची सुरूवात खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आली.
याप्रसंगी भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना खा.अशोक नेते म्हणाले, युवा मोर्चाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने पक्ष संघटनेच्या कामात सदैव पाठीशी उभे राहावे, तसेच युवकांनी नमो चषक-२०२४ साठी जास्तीत जास्त सदस्यांनी नोंदणी करून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार नेते यांनी केले.
यावेळी भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी सुनील अग्रवाल, आर.डी.रहांगडाले, प्रभारी अध्यक्ष परशुराम फुंडे, भाजपचे महामंत्री रामदास हत्तीमारे, मनोज बोपचे, विक्की भाटिया, घनश्याम कटरे, भीमराज बोहरे, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव हितेश डोंगरे, जिल्हा महामंत्री आदित्य शर्मा, जिल्हा सचिव टिकेशबोपचे, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष देवराम चुटे, महामंत्री अरविंद फुंडे, गौरीशंकर टेंभरे, युवा मोर्चाचे पदाधिकारी प्रतीक लिल्हारे, दिनेश उईके, रविंद्र बिसेन, नितीन शिवणकर, पुथ्वीराज शिवणकर, अतुल निमनकर, विशाल चकोले, विजय रहिले, हितेश मेश्राम, धनजीत बैस, दिनेश बावनकर, महिला मोर्चाच्या संयोजिका किरण भगत, श्वेता अग्रवाल, टिना चुटे, युवा मोर्चाचे अन्य पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते.