तेलंगानातील विधानसभा निवडणुकीत खा.अशोक नेते निर्मल जिल्ह्याचे प्रभारी

हैदराबादमध्ये दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा

गडचिरोली : तेलंगाना राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपनेही जिल्हानिहाय प्रभारींची नियुक्ती करून त्यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. त्यात गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्यावर निर्मल जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून भाजपच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेला गुरूवारी हैदराबाद येथे सुरूवात झाली. त्यात खा.अशोक नेते सहभागी झाले आहेत. यावेळी जिल्हा प्रभारींची नियुक्ती जाहीर करण्यात आली. खा.नेते यांच्याकडे निर्मल जिल्ह्यातील खानपूर, निर्मल आणि मुधोली या तीन विधानसभा क्षेत्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या प्रशिक्षण कार्यशाळेत भाजपचे राष्ट्रीय संघटन महामंत्री बी.एल.संतोष, तेलंगानाचे प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री किसन रेड्डी, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, आ.प्रविण दरेकर, डी.के. अरुणा, तसेच अन्य मंत्री व पदाधिकारी सहभागी झाले आहेत.