– तर निवडणुकीपर्यंत पेट्रोलचे दाम ६५ रुपयांवर येतील- ना.वडेट्टीवार

चामोर्शीतील जाहीर सभेत सरकारवर टिका

चामोर्शी : गेल्या ९ वर्षात केंद्र सरकारने पेट्रोल, गॅसचे दर भरमसाठ वाढवून सर्वसामान्यांची लूट केली. पण येत्या लोकसभा निवडणुकीपर्यंत कदाचित पेट्रोलचे दर ६५ रुपयांवर येतील, अशी टिका विधानसभेचे विरोधीपक्ष नेता विजय वडेट्टीवार यांनी केली. जिल्ह्यात काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेदरम्यान सोमवारी चामोर्शी येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

यावेळी मंचावर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस डॅा.नामदेव किरसान, माजी आ.डॅा.नामदेव उसेंडी, माजी आ.आनंदराव गेडाम, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश सचिव डॅा.नितीन कोडवते आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मार्कंडादेव येथून सुरू झालेली ही जनसंवाद पदयात्रा रविवारी भेंडाळा येथे मुक्कामी होती. सोमवारी ही यात्रा चामोर्शीत पोहोचताना ना.विजय वडेट्टीवार हेसुद्धा पदयात्रेत सहभागी झाले. त्यानंतर चामोर्शीत जाहीर सभेला त्यांनी मार्गदर्शन केले.