महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत आज विविध कार्यक्रम

एक दिवसीय गडचिरोली दौरा

गडचिरोली : महिला व बालविकासमंत्री आदिती वरदा सुनील तटकरे 1 सप्टेंबर रोजी गडचिरोली दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात त्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतील. सकाळी 11 वाजता गडचिरोली येथे आगमन झाल्यानंतर एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटनासाठी त्या जिल्हा परिषद हायस्कूल येथे उपस्थित राहतील. दुपारी 12.15 वाजता नवेगाव येथील नुतन अंगणवाडी केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी 1 वाजता पोषण माह कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी संस्कृती भवन येथे उपस्थित राहतील. दुपारी 2 ते 3 ही वेळ राखीव असून त्यानंतर नागपूरकडे रवाना होतील.