कधी न झालेली कामे 10 वर्षात झाली, युवा वर्गाची भाजप महायुतीला पसंती

देसाईगंजमधील युवकांचा पक्षप्रवेश

देसाईगंज : गेल्या 10 वर्षात आरमोरी मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या कृष्णा गजबे यांच्या कार्यकाळात अनेक कामे मार्गी लागली आहेत. पुढेही अशाच विकासात्मक कामांना चालना देण्यासाठी आणि महायुतीचे उमेदवार कृष्णा गजबे यांच्या विजयाच्या हॅट्रिकसाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार, असे संकल्प करत शहरातील अनेक युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

देसाईगंज शहरात मंजूर झालेले उपजिल्हा रुग्णालय, अनेक वर्षात होऊ न शकलेल्या बसस्थानकाला मंजुरी, 66 कोटीच्या पाणीपुरवढा योजनेला मंजुरी, तसेच राष्ट्रीय महामार्ग, शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या पुनर्बांधणीसाठी आणलेला भरघोस निधी यामुळे देसाईगंज शहराची विकासाकडे वाटचाल सुरू आहे. यामुळे प्रभावित होऊन शिवाजी वार्डातील अनेक युवकांनी गुरूवारी (दि.14) भाजपच्या प्रचार कार्यालयात पक्षप्रवेश केला.

या कार्यक्रमाला गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार, आमदार कृष्णा गजबे, लोकसभा समन्वयक किशन नागदेवे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, जिल्हा उपाध्यक्ष राजू जेठानी, जिल्हा सचिव सचिन वानखेडे, शहराध्यक्ष सचिन खरकाटे, सतपाल नागदेवे, अमोल नाकाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

पक्षप्रवेश करणाऱ्या युवकांमध्ये सनी लालवानी, अमोल मक्कड, निलेश फापट, पिंटू मक्कड, मोंटी मक्कड, रोहित नागदेवे, गामेश मटाले, वेदांत खानोरकर, दीपेश रणदिवे, मंगेश शिंगाडे, सागर कावळे, हितेश नखाते, सुमित गगनानी, अवेश शेख, शुभम मेश्राम, काश्मीर गजभिये, राहुल सुखदेवे, ऋषण नेवारे, रुसन सहारे, साहिल धाकडे यांच्यासह इतर अनेक युवकांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे संचालन जोतू तेलतुमडे यांनी तर आभार भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पारधी यांनी मानले.