चामोर्शी तालुक्यात बाईक रॅलीतून डॉ.मिलिंद नरोटे यांच्या प्रचाराला वेग

आश्वासक चेहऱ्यामुळे मिळतेय पसंती

गडचिरोली : महायुती व भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ.मिलिंद नरोटे यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या ग्रामीण भागात गावोगावी पोहोचून प्रचारात आघाडी घेतली आहे. महायुतीच्या जनआशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून गडचिरोली, चामोर्शी व धानोरा तालुक्यातील प्रत्येक गावी जाऊन डॉ.नरोटे यांनी नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यात चामोर्शी तालुक्यात काढलेल्या बाईक रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

महायुती व भाजपचे पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी डॅा.मिलिंद नरोटे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी चामोर्शी शहर आणि येनापूर व जैरामपूर मार्गावर बाईक रॅली काढली. चित्तरंजनपूर येथे कालीमाता मंदिरात पुजा करून व भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला वंदन करून या रॅलीची सुरूवात करण्यात आली. येनापूर, दुर्गापूर, लक्ष्मणपूर, मुधोली चक क्र.१, मुधोली चक क्र.२, जैरामपूर असा रॅलीचा मार्ग होता. जैरामपूर येथे छोटेखानी सभा घेऊन रॅलीचा समारोप करण्यात आला. या क्षेत्राच्या विकासाकरिता मी सदैव कटिबद्ध राहीन, गाव तिथे वाचनालय ही संकल्पना घेऊन प्रत्येक गावात वाचनालय बनवेन, असे डॅा.नरोटे यांनी सांगितले.

यावेळी चामोर्शीसह अनेक गावातील नागरिक, भाजपा व महायुतीचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.