गडचिरोली : राष्ट्रवादी युवक काँग्रेस गडचिरोलीतर्फे ‘युवा संवाद-वेध भविष्याचा’ हे एकदिवसीय विचारमंथन शिबिर येत्या सोमवार, दि.4 मार्चला सकाळी 10.30 वाजता सुमानंद सभागृह येथे होणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युवक पदाधिकाऱ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार, युवकांमध्ये संघटन बांधणीकरीता पक्षाचे वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते पार्थ पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, कार्याध्यक्ष निखिल ठाकरे, माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम (हलगेकर), राकाँचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, जि.प.चे माजी सभापती नाना नाकाडे, रा.काँ.चे सरचिटणीस संग्राम कोते पाटील, रायुकॉ निरीक्षक डॉ.अहेफाज देशमुख, महिला रा.काँ.च्या विभागीय अध्यक्ष शाहिन हकीम, सरचिटणीस ऋषिकांत पापळकर, सरचिटणीस युनुस शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी तसेच युवती व विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांनी पत्रकातून दिली.