वणखीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात अनावरण

खा.नेते, पोरेड्डीवार यांची प्रमुख उपस्थिती

आरमोरी : तालुक्यातील मौजा वणखी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ.कृष्णा गजबे यांच्यासह अनेक पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे, रयतेचे राजे होते. स्वराज्याचा संकल्प करताना ते सुराज्य व्हावे असा त्यांचा मानस होता. महाराजांचे आचार-विचार, त्यांनी घालून दिलेली शिकवण आचरणात आणली तर या पुतळा उभारणीचे सार्थक होईल, असे प्रतिपादन अध्यक्षस्थानावरून खासदार अशोक नेते यांनी केले.

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी मंचावर माजी आमदार रामकृष्ण मडावी, माजी आमदार आनंदराव गेडाम, शिक्षण संस्थाचालक भाग्यवान खोब्रागडे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, भाजपचे तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, जिल्हा सचिव नंदु पेठ्ठेवार, कृउबा समितीचे सभापती ईश्वर पासेवार, जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, माजी जि.प.अध्यक्ष सोमय्या पसुला, व्याख्याता भास्कर उरकुडे, ठाणेदार रहांगडाले, मूर्तीकार प्रकाश सोनवाने, ओंकार मडावी, संजय गणवीर तसेच मोठ्या संख्येने गावातील शिवभक्त नागरिक उपस्थित होते.