अहेरी : ‘भाग्यश्री शिशु’ योजनेअंतर्गत बुधवारी (7 जून) रोजी स्तनदा माता व नवजात बाळांना पोषक आहारचे किट वाटप करण्यात आले. 8 मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माजी जि. प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयातून ‘भाग्यश्री शिशु’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. त्या अनुषंगाने दर बुधवारला अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून दर बुधवारला स्तनदा माता व नवजात बाळासाठी पोषक आहार असलेल्या कीटचे वाटप करण्यात येत आहे.
7 जून रोजी झालेल्या किट वाटपप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अहेरी तालुका अध्यक्ष सारिका गडपल्लीवार, शहर अध्यक्ष सुवर्णा पुसालवार, सरिता पारेल्लीवार, श्यामला बेझंकीवार, रजिता पारेल्लीवार आदी महिला उपस्थित होत्या.