शिवनीत खासदार अशोक नेते यांच्या हस्ते गोटुल भवन बांधकामाचे भूमिपूजन

गडचिरोली : ग्रामीण भागात सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विकासात्मक कामे महत्त्वाची असतात. या दृष्टिकोनातून गुरूवारी गडचिरोली तालुक्यातील शिवनी येथे गोटुल भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले.
खासदार नेते यांच्या स्थानिक विकास निधीतून या गोटुल भवनाची उभारणी होणार आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करत ‘बिरसा मुंडा अमर रहे, जय सेवा, जय पेरसापेन, भारत माता की जय’ असा जयघोष करत खा.नेते यांच्या हस्ते कुदड मारून भूमिपूजन पार पडले.

यावेळी एसटी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, भाजप कार्यकर्ते दत्तू माकोडे, माजी सरपंच वसंत गावतुरे, माजी सरपंच शिलाबाई कन्नाके, राकेश राचमलवार, गोटूल समितीचे सदस्यगण गिरीधर जुमनाके, वसंत रायशिडाम, श्रीहरि जुमनाके, ईश्वर जुमनाके, प्रकाश कन्नाके, बाबुराव रायशिडाम, कमल शिडाम, रवींद्र जुमनाके तसेच मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.