गृहमतदानाला नकार देत १११ वर्षाच्या आजीबाई पोहोचल्या मतदान केंद्रावर

हॅट्स ऑफ, पहा ही व्हिडीओ झलक

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात एका 111 वर्षाच्या आजीबाईचे मतदान चर्चेचा विषय झाला आहे. फुलमती बिनोद सरकार असे त्या वृद्ध महिलेने नाव असून त्या मुलचेरा तालुक्यातल्या गोविंदपूर या बंगाली वसाहतीमधील रहिवासी आहेत.

विशेष म्हणजे त्यांनी गृहमतदानाची सुविधा नाकारत शुक्रवारी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. फुलमती सरकार यांचा हा उत्साह इतर मतदारांसाठी आदर्शवत असल्याचे जिल्हाधिकारी संजय दैने यांनी म्हटले आहे.