‘खेलो इंडिया ट्रायबल’साठी प्रीतिलता पुजेरी हिची निवड

इंग्रजी आश्रमशाळेची विद्यार्थिनी

गडचिरोली : खेळ मंत्रालय आणि भारतीय खेळ प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने 18 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत नवी दिल्लीत झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील निवड चाचणीत पहिल्या राष्ट्रीय खेलो इंडिया ट्रायबल गेम्सकरिता येथील सेमाना बायपास रोडवरील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेतील नववीची विद्यार्थिनी प्रीतिलता संतुराम पुजेरी हिची निवड झाली. धनुर्विद्या या खेळातील ‘रिकर्व राऊंड’ या प्रकारात तिची निवड झाली आहे. 28 फेब्रुवारी ते ८ मार्चदरम्यान बिलासपूर (छत्तीसगड) येथे होणाऱ्या स्पर्धेत ती प्रतिनिधीत्व करणार आहे.

या यशाबद्दल सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी अरुण एम., सहाय्यक प्रकल्प अधिकारी वहीद शेख, डॉ.प्रभु सादमवार, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका वंदना महल्ले, क्रीडा अधिकारी घनश्याम वरारकर, चंद्रशेखर मेश्राम, श्रीराज बदोले, नाजूक उईके, सुप्रसिद्ध बडकेलवार, गडचिरोली जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव डॉ.श्याम कोरडे, सुशील अवसरमोल, पायलट प्रोजेक्ट धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राचे मार्गदर्शक रोशन सोळुंखे, कौमुदी श्रीरामवार, हिमालय शेरखी, अधीक्षक देविदास चोपडे, अधीक्षिका निमा राठोड, शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्रीतिलता पुजेरी हिचे कौतुक करत तिला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.