Home राजकीय घडामोडी गडचिरोलीत युवक काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक

गडचिरोलीत युवक काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक

गावागावात युवकांना जोडणार

गडचिरोली : जिल्हा युवक काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक गडचिरोलीत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. जिल्ह्यात युवक काँग्रेसची संघटना अधिक मजबूत करून गावागावात युवकांना पक्षाशी जोडण्याचे काम प्रभावीपणे राबवा, असे मार्गदर्शन युवक काँग्रेसचे नागपूर झोन प्रभारी कपिल ढोके यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

या आढावा बैठकीत नागपूर झोन प्रभारी कपिल ढोके व गडचिरोली जिल्हा प्रभारी सुमंत कुरेकर यांच्या हस्ते गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ॲड.विश्वजीत मारोतराव कोवासे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

बैठकीत युवक काँग्रेसच्या संघटन बळकटीकरण, आगामी कार्यक्रमांचे नियोजन, सदस्य नोंदणी अभियान तसेच विधानसभानिहाय संघटनात्मक आढावा घेण्यात आला. आगामी काळात युवकांच्या प्रश्नांवर प्रभावी लढा उभारण्याबरोबरच पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी गडचिरोली युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, जिल्हा प्रभारी सुमंत कुरेकर, नगरसेवक रमेश चौधरी, प्रदेश सचिव विवेक घोंगडे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष संजय चन्ने, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, अभिजीत धाईत, जिल्हा उपाध्यक्ष कमलेश खोब्रागडे, चारुदत्त पोहणे, सुधीर बांबोडे, मिलिंद बागेसर, तालुकाध्यक्ष प्रेमानंद गोंगले, कुरखेडा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रांजल धाबेकर, अभिषेक वाळके, आशिष घेर, अमन लाकडे, मिलिंद राऊत, लोकेश पोटावी, निकेतन कोरे, सारंग दमाहे, वसीम शेख, लक्ष्मण आतला, वंश इंदुरकर, अमन सय्यद, कुणाल म्हशाखेत्री, पीशांतनू तोरे, अरविंद मडावी यांच्यासह जिल्हाभरातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.