एटापल्ली : समर कँप, अर्थात उन्हाळी शिबिर ही संकल्पना आतापर्यंत केवळ शहरी मुलांपुरती मर्यादित होती. शाळेला सुट्या लागल्यानंतर मुलांमधील क्रीडा कौशल्यासह विविध गुणांना विकसित करण्यासाठी अशा समर कँपचे आयोजन शहरी भागात दरवर्षी केले जाते. परंतू हेडरीसारख्या दुर्गम भागात पहिल्यांदाच मुलांसाठी समर कँप घेण्यात आला. लॅायड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या सुरजागड आयर्न ओर माईन्सतर्फे या १० दिवसीय कँपचे आयोजन केले होते. दि.२९ एप्रिल रोजी पुरसलगोंदीचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांच्या हस्ते समर कँपचे उद्घाटन झाले. यावेळी मुलांना २०० स्पोर्ट्स किट्सचे वाटप करण्यात आले. या शिबिराचा समारोप सोमवार दि.८ मे रोजी होणार आहे. शिबिरादरम्यान अॅथलेटिक, व्हाॅलिबॉल, धनुर्विद्या, कबड्डी, फुटबॉल इत्यादी मैदानी खेळांसह पेंटिंग्स आणि योगाचेही धडे मुलांना देण्यात आले. या समर कँपमधील वातावरणात रममान झाल्याने मुले हरखून गेल्याचे दिसून आले.
समर कँम्पमध्ये रमली दुर्गम भागातील मुले
हेडरी येथे लॅायड्स मेटल्सतर्फे १० दिवसीय शिबिर