राज्यस्तरिय कराटे स्पर्धेत गडचिरोलीची श्रावणी उमरे चमकली

एका सुवर्णासह रजतपदक पटकावले

गडचिरोली : अॅमॅच्युअर ट्रॅडिशनल कराटे असोसिएशनच्या वतीने नागपूर येथे झालेल्या पाचव्या शोतोकान कराटे इंटरनॅशनल आॅफ इंडिया इन्व्हिटेशनल महाराष्ट्र स्टेट कराटे चॅम्पियनशिपमध्ये श्रावणी मिलिंद उमरे हिने उत्कृष्ट कामगिरी करत कुमिते या प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
नागपूर येथील माँट फोर्ट स्कूलमध्ये झालेल्या स्पर्धेत विदर्भ आणि विदर्भाबाहेरील जिल्ह्यातून ४०० पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात श्रावणीने कुमिते प्रकारात सुवर्ण तर काता प्रकारात रजत पदक पटकावले. तिच्या या यशाबद्दल गडचिरोली जिल्हा अॅमॅच्युअर कराटे डो असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत वाघरे, उपाध्यक्ष रूपराज वाकोडे, सचिव योगेश चव्हाण आदींनी कौतुक केले. तिने या यशाचे श्रेय मुख्य प्रशिक्षक शुभम कोंडे, दानिश शेख व पालकांना दिले.
विशेष म्हणजे श्रावणीने गेल्यावर्षी याच राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.