गडचिरोली : नर्सिंग अभ्यासक्रमातील प्रतिष्ठित संस्था असलेल्या चातगावच्या डॉ.साळवे नर्सिंग कॉलेजने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत याही वेळी जी.एन.एम. तृतीय वर्षाचा निकाल 100 टक्के दिला आहे. सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या या परीक्षेत सर्वच्या सर्व 27 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात 10 जण प्रथम श्रेणीत आले आहेत.
महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडीकाल एज्युकेशन मुंबई यांच्याकडून घेण्यात आलेल्या या परीक्षेत आंचल मेश्राम हिने प्रथम, तर अंजली चांद्रगाडे ही द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष डॉ.प्रमोद साळवे यांनी अभिनंदन करत त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सदर विद्यार्थिनींनी या यशाचे श्रेय संस्थाध्यक्ष डॉ.प्रमोद साळवे, प्राचार्य दीप्ती तादुरी, वार्डन निकीता सडमेक, कार्यालयीन प्रमुख अनिल मेश्राम, शिक्षकवृंद तथा स्टुडंट्स नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्ष सानू कोंडागोर्ला यांना दिले आहे.
डॉ.साळवे यांनी वेळोवेळी केलेले योग्य मार्गदर्शन व विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकासाच्या
दृष्टिकोनातून राबविलेले विविध शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांमुळे यामुळे हे यश मिळवता आल्याची प्रतिक्रिया विद्यार्थीनींनी दिली.