गडचिरोली : शहर भाजपा महिला मोर्चाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला मुक्ती दिन म्हणून साजरी करण्यात आली. इंदिरा गांधी चौकातील विश्राम गृहात झालेल्या या कार्यक्रमात भाजपच्या जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांच्या हस्ते पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्या असलेल्या महिलांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना योगिता पिपरे यांनी सावित्रीबाईंच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. सावित्रीबाईंचा विवाह त्यावेळच्या समाजव्यवस्थेप्रमाणे त्या 9 वर्षांच्या असताना झाला. सावित्रीबाईंना लिहिता-वाचता येत नव्हते. कारण महिलांना शाळा शिकण्याचा अधिकारच नव्हता. पण त्यांचे पती ज्योतिबा फुले यांनी त्यांना घरीच शिक्षणाचे धडे दिले. त्यानंतर सावित्रीबाईंनी महाराष्ट्रात विशेषतः पुण्यात असमानता, पितृसत्ताक पद्धत आणि सामाजिक दडपशाहीशी लढण्यासाठी काम केले. सावित्री आणि ज्योतिबांनी ब्रिटिश राजवटीत 1848 मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली भारतीय शाळा सुरू केली. सामाजिक विरोध झुगारून त्यांनी शैक्षणिक कार्य सुरू ठेवले. त्यांच्या अनेक शाळा सुरु झाल्या. त्यांच्या शाळेत शिकवल्या जाणार्या अभ्यासक्रमात वेद आणि शास्त्रासारख्या ग्रंथांऐवजी गणित, विज्ञान आणि सामाजिक अभ्यासांचा समावेश करण्यात आला. आज अनेक महिला शिकून डॉक्टर, वकील, पायलट, अधिकारी झाल्या. अनेक महिला राजकारणात यशस्वी झाल्या. सावित्रीबाईंमुळेच समाजात महिलांची प्रगती झाली, असे योगिता पिपरे यावेळी म्हणाल्या.
कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.देवराव होळी, माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, भाजपचे लोकसभा समन्वयक तथा विधानसभा संयोजक प्रमोद पिपरे, जेष्ठ नेते रमेश भुरसे, माजी सभापती रंजना कोडापे, जेष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, तालुका अध्यक्ष विलास भांडेकर, महिला तालुका अध्यक्ष अर्चना बोरकुटे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, महिला शहर अध्यक्ष कविता उरकुडे, माजी नगरसेवक केशव निंबोड, वैष्णवी नैताम, शहर महामंत्री विवेक बैस, पल्लवी बारापात्रे, अर्चना चन्नावार, अर्चना निंबोड, रश्मी बानमारे, देवाजी लाटकर, प्रा.अरुण उराडे, बेबी चिचघरे, पुनम हेमके, रुमन ठाकरे, कोमल बारसागडे, नीता बैस, ताई नेवारे यांच्यासह भाजपच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.