गडचिरोली : पत्रकार दिनाचे औचित्य साधून आज दि.6 जानेवारी रोजी गडचिरोली प्रेस क्लबच्या वतीने जिल्हा गौरव पुरस्कार प्रदान सोहळा आणि गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात दुपारी 2 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत प्रकाश आमटे आणि समिक्षा अनिकेत आमटे या दाम्पत्याला यावर्षीच्या जिल्हा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार उपस्थित राहणार असून पुरस्कारांचे वितरण लोकसत्ता नागपूर आवृत्तीचे संपादक देवेंद्र गावंडे यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य डॅा.प्रमोद मुनघाटे राहतील. विशेष अतिथी म्हणून आ.डॅा.मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस क्लबचे अध्यक्ष अविनाश भांडेकर राहतील. या कार्यक्रमाला गडचिरोलीकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेस क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.