अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील प्रभाग क्रमांक तीन मधील अंगणवाडीच्या चिमुकल्यांना नुतन इमारत मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते या नुतन इमारतीसाठी भूमिपूजन करण्यात आले.
प्रभाग क्रमांक तीन मध्ये सध्या असलेली अंगणवाडीची इमारत मोडकळीस आली आहे. या इमारतीच्या बांधकामाला बरेच वर्ष झाल्याने या ठिकाणी नुतन इमारत बांधण्याची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी १४.७५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.
या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. या प्रभागातील चिमुकल्यांना अंगणवाडीची नूतन इमारत मिळणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
भूमिपूजनप्रसंगी सरपंच शंकर मेश्राम, उपसरपंच विनोद अक्कनपल्लीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, सदस्य पुष्पा अलोने, सोमेश्वर रामटेके, मनोज बोलूवार, स्वप्नील श्रीरामवार, राकाँचे कार्यकर्ते कैलास कोरेत, मुन्ना शेख, नरेश मादेशी, अक्षय डोंगरे, मिनाचंत डोंगरे, अंगणवाडी सेविका शबिना शेख, तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.