गडचिरोली : ओबीसीची जातनिहाय जनगनणा करण्यात यावी यासह इतर प्रमुख मागण्यांना घेऊन जिल्ह्यातील युवक 4 मार्चपासून गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात बेमुदत साखळी उपोषणावर बसले आहेत. दरम्यान उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी अनेक राजकीय व सामाजिक संघटनांनी भेट देऊन त्यांना पाठिबा दर्शविला.
यावेळी राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राहुल भांडेकर, विदर्भ विभागीय प्रसिद्धी प्रमुख पंकज खोबे, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष पदम भुरसे, अनुप कोहळे, ओबीसी नेते सुरेश भांडेकर, सुनील चडगुलवार, संतोषी सुत्रपवार, अजय सोमनकर, आकाश आंबोरकर, बादल गडपायले, रोशन कोहळे, प्रफुल आंबोरकर, साहिल धोडरे, सचिन पिपरे, सत्यवान पिपरे, मोरेश्वर चौधरी, अमित सुरजगाडे, नंदकिशोर भांडेकर, आकाश भोवरे, स्नेहल कुनघाडकर, नितेश कुनघाडकर, निलेश कुनघाडकर, पवन बरसागडे, पंकज सातपुते, अक्षय कोठारे, प्राणिल सातपुते , अभिषेक कुंनघाडकर, दीप सातपुते, सुरज कुनघाडकर, मनोरंजन गव्हारे, नरेश आभारे, आकाश सातपुते, आकाश सोनटक्के, रोशन सातपुते, सुहास पिपरे, अक्षय भांडेकर, योगीराज सुरजगाडे, योगेश बरसागडे, नवलेश्व वैरागडे, रमेश मेश्राम, मेघराज वसेकर, विजू उरकुडे, मधुकर नैताम, खोजेंद्र सातपुते आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
उपोषणामागील प्रमुख मागण्या
बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात आणि देशात जातीनिहाय जणगणना करण्यात यावी, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, ओबीसी विद्यार्थ्यासाठी मंजूर करण्यात आलेले वसतिगृह तत्काळ सुरु करण्यात यावे, ओबीसींसह सर्व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तत्काळ देण्यात यावी, गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसीचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत लागू करण्यात यावे आणि इतर मागण्यांचा समावेश आहे.