23 व्या अ.भा.पोलिस वॅाटर स्पोर्ट्स स्पर्धेत गडचिरोलीच्या पोलिस अधिका­ऱ्याला सुवर्ण

आरमोरीच्या पीएसआयची कामगिरी

गडचिरोली : जम्मू-काश्मिर पोलिसांच्या वतीने श्रीनगर येथे 2 ते 8 मार्च 2024 दरम्यान आयोजित 23 व्या अखिल भारतीय पोलिस वॅाटर स्पोर्ट्स स्पर्धेत गडचिरोली पोलिस दलातील उपनिरीक्षक संतोष कडाळे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.

आरमोरी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत पीएसआय कडाळे यांनी अतिशय थंड (-1° ते -4°) इतक्या कमी तापमानात, कमी ऑक्सिजनमध्ये खेळल्या जाणा­ऱ्या कॅाक्सलेस फोर 1000 मीटर या क्रीडा प्रकारात महाराष्ट्र पोलिस संघाचे नेतृत्व करत सुवर्णपदक पटकावले.

नक्षलग्रस्त संवेदनशिल जिल्हा असलेल्या गडचिरोली पोलिस दलातील अधिकारी व जवान ग्रामीण भागात आपली सेवा बजावत विविध कलागुण जोपासत आहेत.

उपनिरीक्षक संतोष कडाळे यांच्या या यशस्वी कामगिरीसाठी अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) एम.रमेश यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.