गडचिरोली : जवळपास आठवडाभरापासून वादळ आणि अवकाळी पावसाचा सामना करणाऱ्या गडचिरोलीकरांसाठी आणखी पुढचे चार दिवस असेच वादळी वातावरणाचे राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे. त्यामुळे जिल्हावासियांना योग्य ती खबरदारी घ्यावी लागणार आहे.
हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, रविवार दि.11 मे पर्यंत जिल्ह्यात एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवडाभरात अनेक ठिकाणी वादळासह काही ठिकाणी पाऊस आणि गारपिटही झाली. त्यामुळे घरांचे आणि शेतातील पीकांचे बरेच नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे अजून झालेले नाही. त्यात पुन्हा वादळाचा इशारा देण्यात आला आहे.