देशाला युद्ध नव्हे तर बुद्धाची गरज, संविधान दिनी आ.गजबे यांचे प्रतिपादन

तथागत गौतम बुद्धाच्या पुतळ्याचे अनावरण

देसाईगंज : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान अनमोल ठेवा आहे. देशाला युद्ध नव्हे तर बुद्धाची गरज आहे. म्हणून आपण डॉ.आंबेडकरांनी स्वीकारलेल्या धम्माचे आचरण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले. देसाईगंज येथील त्रिरत्न बुद्ध विहार, पंचशील चौक, हनुमान वॉर्ड यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

यावेळी अध्यक्षस्थानी लाँग मार्चचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.युवराज मेश्राम, देसाईगंजच्या माजी नगराध्यक्ष शालू दंडवते, जावेद पाशा यांच्यासह त्रिरत्न बुद्ध विहाराचे अनुयायी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात प्रास्ताविकेचे वाचन

संविधान दिनाचे औचित्य साधून गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या चामोर्शी मार्गावरील जनसंपर्क कार्यालयात संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथा संविधान प्रास्ताविकेस पुष्पहार अर्पण करून प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले.

याप्रसंगी भाजपाचे जेष्ठ नेते रमेश भुरसे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, कामगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर पेटकर, दलित आघाडीचे जिल्हा महामंत्री जनार्धन साखरे, भाजपा जिल्हा सचिव वर्षा शेडमाके प्रामुख्याने उपस्थित होते.