गडचिरोलीत धर्मरावबाबा आत्राम यांच्या जनसहायता कार्यालयाचे उद्घाटन

दुर्गम नागरिकांच्या समस्या सोडविणार

गडचिरोली : अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या जनसहायता कार्यालयाचे उद्घाटन माजी जि.प.अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. गडचिरोली येथील गणेश नगर कॉलनीतील अनंत हॉस्पिटलजवळ हे कार्यालय आहे. यावेळी सिनेट सदस्य तनुश्री आत्राम आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

दुर्गम भागातील लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविणे आणि सर्व नागरिकांपर्यंत नवनवीन योजना पोहोचविणे हा उद्देश असल्याचे तनुश्री आत्राम यावेळी म्हणाल्या. नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या कार्यालयीन कामाकरीता मदतीची गरज असेल तर त्यांनी तनुश्री धर्मरावबाबा आत्राम (सिनेट सदस्य, गोंडवाना विद्यापीठ) यांच्याशी 8605986779, 8275877177 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.