अहेरी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अहेरी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील बौद्ध विहाराच्या पटांगणात ज्ञान प्रसारक नवयुवक मंडळाच्या वतीने, तर दीक्षाभूमी येथे बोधीसत्व बहुद्देशीय सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पंचशील ध्वज फडकविण्यात आले. अहेरी शहरातून सकाळी काढलेली बाईक रॅली आणि सायंकाळी निघालेल्या भव्य भीम रॅलीने अहेरीकरांचे लक्ष वेधून घेतले.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते अहेरीच्या मुख्य चौकात केक कापून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी भीमगितांच्या तालावार आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहात सहभागी होत भाग्यश्रीताई यांनीही ठेका धरत नृत्याचा आनंद घेतला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने अहेरी नगरी दुमदुमली.
यावेळी सुरेंद्र अलोणे, सेवानिवृत्त प्राचार्य रतन दुर्गे, महेश अलोणे, रामचंद्र ढोलगे, कपिल ढोलगे, करण दहागावकर, राहुल गर्गम, कपिल ढोलगे, प्रणय अलोणे, कपिल दुर्गे, कपिल झाडे, छत्रपती गोवर्धन, हरिदास ओंडरे यांच्यासह असंख्य समाजबांधव उपस्थित होते.