गडचिरोली : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली आणि युथ फॉर जॉब फाऊंडेशन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने 28 जानेवारी 2025 रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. गडचिरोलीतील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय चौक) येथे सकाळी 11 वाजता हा मेळावा होणार आहे.
सदर रोजगार मेळाव्यामध्ये काही कंपन्या उपस्थित राहणार आहेत. रोजगारासंदर्भात लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेरॉक्ससह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपस्थित राहावे. अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे.
































