राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) कडून शहीद पोलीस परिवारातील महिलांचा सन्मान

गडचिरोली : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने शहीद कुटुंबीयांचा सन्मान सोहळा पार पडला. येथील गोकुळनगरातील आशीर्वाद सभागृहात झालेल्या या सोहळ्यात शहीद पोलिसांच्या कुटुंबातील महिलांना शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि संविधान उद्देशिका देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, प्रदेश चिटणीस अॅड.संजय ठाकरे, गडचिरोली शहर अध्यक्ष विजय गोरडवार, जिल्हा उपाध्यक्ष नईम शेख, माजी नगरसेविका मीनल चिमुरकर, सेवादलाचे तालुकाध्यक्ष सुनील कत्रोजवार, शहर उपाध्यक्ष भास्कर निमजे, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष चंदू शिवणकर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील चिमुरकर, जिल्हा उपाध्यक्ष विमल भोयर, ओबीसी महिला जिल्हा उपाध्यक्ष निता बोबाटे, तालुका मुख्य संघटक निलेश कोटगले, सेवादलाचे शहर अध्यक्ष मल्लया कालवा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी वीर परिवारातील रेखा फागु कोराम, संगीता विलास मांदाळे, नयना पुरुषोत्तम मेश्राम, विजया रवींद्र चौधरी, लक्ष्मी परदेशी देवांगन, निर्मला सुरेश गावडे, कल्पना पुरनशहा दुग्गा, सगुना दानशू वडे, समिना हेमराज टेंभुर्णे, हर्ष संतोष दुर्गे, राशी डोगे आत्राम, अलका अविनाश रणदिवे, मनीषा दुर्योधन नागतोडे, तसेच वीर शहीद स्वरूप अमृतकर यांच्या मातोश्री कल्पना अमृतकर आदी महिला उपस्थित होत्या. यावेळी शहीद कुटुंबीयांनी आपापल्या अडचणी कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त केल्या. आम्ही शहीद कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही यावेळी जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी दिली.

या कार्यक्रमांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन माजी नगरसेविका मिनल चिमूरकर यांनी तर आभार प्रदर्शन शहर उपाध्यक्ष भास्कर निमजे यांनी केले.