जिल्ह्यातील विकास प्रकल्पांवर मा.खा. नेते यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा

कामांना गती देण्यासाठी घेतली भेट

गडचिरोली : गडचिरोलीत नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी अविश्यां पंडा यांची भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोक नेते यांनी भेट घेऊन त्यांचे जिल्ह्यात रुजू झाल्याबद्दल स्वागत केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विकासात्मक प्रकल्पांवर चर्चा केली.

या भेटीदरम्यान नेते यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत गडचिरोलीच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर माहिती देऊन त्यातील अडचणींवरही चर्चा केली. या भेटीने जिल्ह्यातील विकासकामांना आणखी गती देण्यासाठी जिल्हाधिकारी योग्य ते दिशानिर्देश निश्चित करतील अशी अपेक्षा मा.खा.नेते यांनी व्यक्त केली. याप्रसंगी भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम यांचीही उपस्थिती होती.