देसाईगंज : राष्ट्रीय वन्यजीव कृती आराखड्याअंतर्गत वने व वन्यजीव संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्रालगतच्या गावामध्ये ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग घेऊन ‘जन-वन विकास’ साधण्यासाठी शासनाने डॅा.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास’ योजनेअंतर्गत वॉटर कॅनचे वाटप आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जवळपास 360 ग्रामस्थांना वॉटर कॅनचे वाटप करण्यात आले. मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वनविभागातर्फे डॉ.श्यामप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून वनालगतच्या गावांमधील नागरिकांना वॉटर कॅन उपलब्ध करुन दिले.
यावेळी आमदार कृष्णा गजबे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, माजी पं.स.उपसभापती गोपाल उईके, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय धांडे, सरपंच सुषमा सयाम, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन राऊत , डोंगरगाव वन समिती अध्यक्ष बद्रीनाथ राऊत, प्रमोद झिलपे, नानाजी सयाम, पोलीस पाटील हेमंत दर्वे, अस्मिता दर्वे, मनीषा नान्ने, वासुदेव झिल्पे, राजेंद्र दुपारे, कुसुम दुपारे, नीलकंठ मेश्राम, विद्या सूर्यवंशी, रेश्मा मेश्राम आदी उपस्थित होते.