आमदारांनीही घेतला बचाव पथकाच्या ‘मॉक ड्रिल’चा अनुभव

पुण्याच्या एनडीआरएफ टिमकडून कोटगल बॅरेजवर प्रात्यक्षिक

गडचिरोली : राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ५ क्रमांकाच्या नागपूर येथील तुकडीकडून सध्या गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थितीमधील बचावाचे प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण दिले जात आहे. सोबत आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती केली जात आहे. शुक्रवारी वैनगंगा नदीवरील कोटगल बॅरेजमध्ये केलेल्या प्रात्यक्षिकाला आमदार डॅा.देवराव होळी यांनी हजेरी लावून मोटार बोटमधून प्रवास करत मॅाक ड्रीलमध्ये सहभाग घेतला.

यावेळी डॅा.होळी यांनी बचाव पथक तसेच बचाव साहित्य याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे, एनडीआरएफ पथक प्रमुख निरीक्षकर प्रदीप, डॉ.उमेश सिडाम तसेच विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी, आपदा मित्र उपस्थित होते.