गडचिरोली : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांची घोषणा झाली असून राज्यातील 110 शिक्षकांच्या यादीत गडचिरोली जिल्ह्यातील चार शिक्षकांचा समावेश आहे. येत्या 5 सप्टेंबरला शिक्षक दिनी मुंबईत होणाऱ्या सोहळ्यात त्यांना पुरस्कृत केले जाणार आहे.
त्या चार गुणी शिक्षकांमध्ये बिगर आदिवासी क्षेत्रातून गडचिरोलीतील राणी दुर्गावती कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका प्रा.संध्या शेषराव येलेकर, चामोर्शी तालुक्यातील नवेगाव रै.येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक आशिष अशोक येल्लेवार, तसेच आदिवासी क्षेत्रातून धानोरा तालुक्याच्या कारवाफा येथील जि.प.शाळेचे शिक्षक जितेंद्र गोविंदा रायपुरे आणि एटापल्ली तालुक्याच्या वाळवी येथील जि.प.शाळेचे शिक्षक श्रीकांत काटेलवार यांचा समावेश आहे.