सिरोंचा : तालुक्यातील नगरम येथे दरवर्षी गंगादेवी पुजनाचा कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने आयोजित केला जातो. यावर्षीच्या कार्यक्रमासाठी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आर्थिक मदत केली.
नगरम येथे याही वर्षी गंगादेवी पुजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. या उत्सवात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. सदर कार्यक्रमासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडून आयोजकांना सहकार्य म्हणून मोठ्या निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सिरोंचाचे पदाधिकारी नगरसेवक सतीश भोगे, रवि सुल्तान, ओमप्रकाश ताटीकोंडावार, सलाम शेख़, रमेश गादमवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.