देसाईगंज : तालुका मुख्यालयापासून 8 किमी अंतरावर असलेल्या कोंढाळा येथे बुराडे परिवाराच्या पुढाकाराने रंगपंचमीला मेघनाद जत्रेचे आयोजन केले जाते. एक दिवस अगोदर रात्रीला मेघनाद देवाची पूजाअर्चा केली जाते. रात्रभर पुजा करून दुसऱ्या दिवशी सकाळी जत्रेच्या ठिकाणी पुजा करून जत्रेला सुरूवात केली जाते.
तालुक्यातील पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या कोंढाळा गावात यावर्षी बुराडे परिवाराने उत्साहात या जत्रेसाठी पुढाकार घेतला. तालुक्यातील लोकांनी जत्रेसाठी एकच गर्दी केली. जत्रेनिमित्त शेकडो दुकाने लागली होती. उन्हाळा लागल्याने मातीची भांडी जास्त प्रमाणात विकली जातात.
कलाकारांचे गाव म्हणून कोंढाळा गावाला ओळखले जाते. अनेक कलाकार याच गावातून घडले आहेत. गावातील उत्कृष्ट कलाकार एकत्रित येऊन जत्रेनिमित्त नाटकांचे प्रयोग दाखवतात.