आलापल्ली : अहेरी पत्रकार संघटनेची नवीन कार्यकारिणी रविवार, दि.29 डिसेंबर रोजी येथील शासकीय विश्रामगृहात गठित करण्यात आली. पंकज नौनुरवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत 2025 या वर्षाकरिता सुरेंद्र अलोणे यांची अध्यक्षपदी तर अशोक पागे यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणीत कोषाध्यक्षपदी सोहिल वाळके तर सहसचिवपदी आशिष सुनतकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्यकारिणीतील सदस्यांमध्ये विवेक बेझलवार, प्रतीक मुधोळकर, दीपक सुनतकर, अमित बेझलवार, प्रशांत नामनवार, सुधाकर उमरगुंडावार, विजय सुनतकर, संतोष मद्दीवाऱ, गिरीष मद्देर्लावार, संजय धुर्वे, रवी नेलकुद्री, राहुल गर्गम आदींचा समावेश आहे.
कार्यकारिणी गठित झाल्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. येत्या 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यासह अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली